जिथे तिथे नुसते शब्दांचेच बुडबुडे
नाही कुठे दिसे प्रेमाचे ओलावे
नाही कुठे दिसे प्रेमाचे ओलावे
जिथे शब्दांनी शब्दांनी शब्द वाढता
तिथे तुटे संवाद मना मनांचा
जेथे जाहला माणूस माणूसकीस पारखा
तेथे न ये ओळखू आपला परका
तेथे न ये ओळखू आपला परका
भाव भावनांचे तुटती ते बंध
या साऱ्याचा नाही कुणा गंध
या साऱ्याचा नाही कुणा गंध
शब्दां शब्दांत यावा प्रेमाचा ओलावा.
मग पोहचेल गंध तेथे भावनांचा
मग पोहचेल गंध तेथे भावनांचा
मी तुझा हा होईल आभास
मग त्या त्या श्रांतल्या जीवास
मग त्या त्या श्रांतल्या जीवास
माणूस म्हणूनी द्या आधार माणसांस
माणूस म्हणूनी मानतील तुज माणसं
....मी एक माणूस
माणूस म्हणूनी मानतील तुज माणसं
....मी एक माणूस
No comments:
Post a Comment