Thursday, October 14, 2021

मी आणि माझे...



मी म्हणजे मी म्हणजे मी असतो
तुमचा माझा सेम असतो

माझ्याशिवाय मी, मी नसतो
माझ्याशिवाय माझा मी नसतो

मी, माझे माझे नि मी मी करतो
पण करता करविता तो असतो

मला वाटते माझे मी करतो
पण तो माझेकरवी तो करवितो

करता करविता असता तो
मी मात्र माझे माझे करतो

तुझे माझे माझे तुझे करताना
मी आणि माझे, माझे असते का?

मी आणि माझे...

No comments:

Post a Comment