Thursday, October 14, 2021

रिकामं मन

असं म्हणतात रिकामं मन सैतानाचे घर
पण मला सांगा खरचं रिकामं असतं का मन

ते तर असतं विचारांनी नि विकारांनी भरलेलं भारलेलं
उद्याची चिंता अन् आजची काळजी यानं भरलेलं

मनामध्ये आपल्या असतात अनेकाअनेक विचार
मनामध्ये आपल्या असतात अनेकाअनेक विकार

विकारांवर स्वार मन होत का सैतानाचे घर
का विकारांवविना मन होतं देवाचं देवालय

आता हे ज्याचं त्यांनीच ठरवावं आपल मन
असावें कसं सैतानाचे घर की देवाचं देवालय

म्हणूनचं तर सांगा म्हणतो मी
असतं का रिकामं मन कधी

रिकाम्या माझ्या मनी एक विचार आला
सांगा तुम्हीच शब्दांमधे बांधण्या जमला का मला

No comments:

Post a Comment