Tuesday, May 19, 2020

दूर करी हे संकट अनंता...

घरा बैसोनिया सारे जन
वेळ हा कैसा जाता जाईना

कोणी पाही रामायण-महाभारत
कोणी लावी हा चित्रपट

कोणासी केवळ मनी मानसी चिंतन
तरी हा वेळ हा जाईना निरंतर

कोरोनाचा हा खेळ चाले जगभर
थांबले हे जग क्षणभर

सुनील म्हणे हे पाहवे ना डोळा
आता तरा तुज येवो दयाघना

नाडले हे जन जन सारे
तुजवीण अनंता कोण धावे

धाव धाव आता रे भगवंता
दूर करी हे संकट अनंता

No comments:

Post a Comment