अविस्मरणीय असे काही क्षण
दु:खाचे, आनंदाचे काही क्षण
स्मृतीत राहतात कायमचे असे क्षण
विस्मृतीत जातात असे काही क्षण
क्षणोक्षणी आठवात राहतात काही क्षण
क्षणभंगुर असूनही भासत राहतात काही क्षण
आज आत्ता क्षणापूर्वी अनुभवलेले काही क्षण
क्षणोक्षणी जाणवते अनुभूतीचे भारलेपण
अनुभूती क्षणांपूर्ती की क्षणाक्षणांची अनुभूती
न भूतो न भविष्यती की क्षणिक वर्तमानाची पूर्ती

No comments:
Post a Comment