Sunday, April 12, 2020

कोण कुठला व्हायरस कोरोना...

काम, काम अन् काम नुसते काम
करतो आहे गेले पंधरा दिवस काम

काम, काम आहे भरपूर काम
पण माहित नाही त्याचा मिळणार कधी दाम

करून करून इतके अपार कष्ट
कुणास ठाऊक होईल का लक्ष्मी संतुष्ट

‘लाॅकडाऊन’च्या या जमान्यात थांबले रहाटगाडगे
पण भरायचे राहिल का हे पोटाचे खळगे

‘लाॅकडाऊन’ नंतर म्हणत, ‘पुन:श्र्च हरीॐ’
ऊभे राहू सारे जिद्दीनं

कोण कुठला व्हायरस कोरोना
हा आपल्या आधी का जन्मला

काल परवा अवतरलेला एवढासा जीव
सर्वांचा लागला आहे टांगणीला जीव

घरामध्येच राहू अन् सोशल डिस्टसिंग पाळू
मिळून सारेजण ह्या दैत्या पळवून लावू

No comments:

Post a Comment