Sunday, April 29, 2012

माणूसकी

हरवली आहे 'माणूसकी', मी शोधतो आहे केव्हाचा
काल परवा पर्यंत पाहिल्याचे आठवते मला, म्हणत होते आजोबा
कधी कशी कुठे गायब झाली कळत नाही मला

पेपरात दिली होती जाहिरात 'हरवली आहे' म्हणून
दूरदर्शनवरही पाहिली होती 'आपण यांना पाहिलात का ?' मधून
पोलीस चौकीवरही पहिला होता फोटो ''मिसिंग' मधून

कोणी म्हणतो, काल परवापर्यंत ती होती गुंडांमध्येही  'वसून'
पण आता तर ती झाली आहे पोलिसांतही 'मिसिंग'
कशी काय कोण जाणे झाली कशी 'मिसिंग'

कोणी म्हणतो 'मेली' आहे माणूसकी जीवित नाही आता 
तर कधी कोणा दिसते कोठे कोठे धुकधुकी अजून
तर कधी कोणा दिसती तिच्या अस्तित्वाच्या खूणा 

सापडली जर तुम्हा कुठे, कळवा मला जरूर
माणूस माझे नाव, वसुंधरा माझे गाव माझा पत्ता 
'माणूसकी' माझी मला सापडून द्या आत्ता  

 -- सुनील
  

No comments:

Post a Comment